IITM Pune Bharti 2025: पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM), पुणे येथे एकूण 218 पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 188 प्रोजेक्ट सायंटिस्ट आणि सायंटिफिक असिस्टंट पदे, तसेच 30 रिसर्च फेलो (MRFP) पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे अर्ज करण्याची अंतिम तारीख आता 22 मे 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
🔍 भरतीचे तपशील
📌 एकूण पदे: 218 (188 + 30)
📌 नोकरी ठिकाण: पुणे
📌 अर्ज फी: नाही
📋 पदांनुसार तपशील (188 पदांसाठी)
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-E | 05 |
2 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-III | 24 |
3 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-II | 37 |
4 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-I | 94 |
5 | सायंटिफिक असिस्टंट | 28 |
🎓 शैक्षणिक पात्रता
पदांनुसार विविध पदवी/पदव्युत्तर पदव्या आवश्यक आहेत. यामध्ये Physics, Chemistry, Mathematics, Atmospheric Sciences, Electronics, Data Science, Computer Science, Environmental Sciences, Oceanography अशा विविध शाखांचा समावेश आहे. काही पदांसाठी अनुभव आवश्यक आहे (3 ते 11 वर्षांपर्यंत).
⏳ वयोमर्यादा (15 मे 2025 अनुसार)
पद | वयोमर्यादा |
---|---|
Scientist-E | 50 वर्षांपर्यंत |
Scientist-III | 45 वर्षांपर्यंत |
Scientist-II | 40 वर्षांपर्यंत |
Scientist-I | 35 वर्षांपर्यंत |
Scientific Assistant | 28 वर्षांपर्यंत |
सूट: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे
📅 महत्वाच्या तारखा
- ✅ ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख:
15 मे 2025➡️ 22 मे 2025 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
🔗 महत्वाच्या लिंक्स
- 📑 शुद्धीपत्रक: Click Here
- 📜 जाहिरात (PDF): Click Here