भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये वैज्ञानिक/इंजिनिअर पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती ISRO Telemetry, Tracking and Command Network आणि Physical Research Laboratory (PRL) अंतर्गत केली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
📌 पदांचे तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | Scientist/Engineer ‘SC’ (Electronics) | 113 |
2 | Scientist/Engineer ‘SC’ (Mechanical) | 160 |
3 | Scientist/Engineer ‘SC’ (Computer Science) | 44 |
4 | Scientist/Engineer ‘SC’ (Electronics) – PRL | 02 |
5 | Scientist/Engineer ‘SC’ (Computer Science) – PRL | 01 |
एकूण | 320 |
🎓 शैक्षणिक पात्रता:
सर्व पदांसाठी किमान 65% गुणांसह संबंधित शाखेतील B.E./B.Tech पदवी आवश्यक.
- Electronics & Communication: पद क्र. 1 व 4
- Mechanical Engineering: पद क्र. 2
- Computer Science: पद क्र. 3 व 5
🎂 वयोमर्यादा (16 जून 2025 रोजी):
- 18 ते 28 वर्षे
- SC/ST उमेदवारांसाठी: 05 वर्षे वयोमर्यादा सवलत
- OBC उमेदवारांसाठी: 03 वर्षे वयोमर्यादा सवलत
💰 अर्ज शुल्क:
- सर्व उमेदवार: ₹750/-
- SC/ST/PWD/महिला/ExSM: पूर्ण ₹750/- परतावा
- Gen/OBC: ₹500/- परतावा अर्ज स्वीकृत झाल्यानंतर
📅 महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 16 जून 2025
- परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर केली जाईल