IITM Pune Bharti 2025 – पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या Indian Institute of Tropical Meteorology (IITM), Pune मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर झाली आहे. एकूण 178 रिक्त पदांसाठी ही भरती केली जात आहे. प्रोजेक्ट सायंटिस्ट-E, III, II, I आणि सायंटिफिक असिस्टंट या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
🔍 भरतीची माहिती:
- संस्था: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे
- जाहिरात क्र.: PER /07/2023
- एकूण पदसंख्या: 178
- अर्ज पद्धत: ऑनलाईन
- अर्जाची अंतिम तारीख: 15 मे 2025 (सायं. 5:00 पर्यंत)
- अर्ज फी: नाही
- नोकरी ठिकाण: पुणे
📌 पदांची माहिती:
पद क्र. | पदाचे नाव | जागा |
---|---|---|
1 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-E | 05 |
2 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-III | 24 |
3 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-II | 35 |
4 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-I | 88 |
5 | सायंटिफिक असिस्टंट | 26 |
Total | 178 |
🎓 शैक्षणिक पात्रता:
प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव खालीलप्रमाणे आहे:
- प्रोजेक्ट सायंटिस्ट-E: संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा M.E./M.Tech आणि 11 वर्षांचा अनुभव
- प्रोजेक्ट सायंटिस्ट-III: 60% गुणांसह संबंधित शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आणि 7 वर्षांचा अनुभव
- प्रोजेक्ट सायंटिस्ट-II: 60% गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी आणि 3 वर्षांचा अनुभव
- प्रोजेक्ट सायंटिस्ट-I: संबंधित शाखेत 60% गुणांसह पदवी किंवा M.Tech
- सायंटिफिक असिस्टंट: 50% गुणांसह B.Sc किंवा संगणक/डिझाईन/ग्राफिक्स/मास कम्युनिकेशन यामधील पदवी
🎯 वयोमर्यादा (15 मे 2025 रोजी):
- प्रोजेक्ट सायंटिस्ट-E: 50 वर्षे
- प्रोजेक्ट सायंटिस्ट-III: 45 वर्षे
- प्रोजेक्ट सायंटिस्ट-II: 40 वर्षे
- प्रोजेक्ट सायंटिस्ट-I: 35 वर्षे
- सायंटिफिक असिस्टंट: 28 वर्षे
[SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट]